सावधान…कणकवलीत कोरोनाने एकाचा बळी

0
822

कणकवली | प्रतिनिधी | दि. ३ : कणकवली तालुक्यात कोरोनाच्या संकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  आज पुन्हा
कणकवली तालुक्यात नव्याने १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये कणकवली शहरात ८, कुर्ली १,साकेडी १, दारिस्ते १,तळवडे ३, कलमठ ३, असे मिळून तालुक्यात एकूण १८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर वरवडे फणसनगर येथील एका ६२ वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण २१८१ रूग्णांची संख्या झाली आहे. कणकवली तालुक्यातील नागरिकांनी आता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.