स्वाभिमानने ग्लेज इंडिया चेन मार्केटिंगमधील जिल्ह्यातील २४ युवकांना आणले परत

0
628
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या आदेशानुसार ग्लेज ट्रेडींग इंडिया नावाने चेन मार्केटिंग चालविणाऱ्या कंपनीच्या तावडीतून सिंधुदुर्गातील २४ युवकांची सुखरूप सुटका करून त्यांना सहीसलामत जिल्ह्यात आणले. स्वाभिमानचे कार्यकर्ते जगदीश चव्हाण यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्ह्यातील २४ युवकांना औरंगाबाद येथून आणत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. तब्बल ५ दिवसानंतर मिशन औरंगाबाद स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी फत्ते केलं. सिंधुदुर्गातील २४ युवकांना ग्लेज इंडिया या चेन मार्केटींगच्या तावडीतून सोडवित स्वाभिमानचे कार्यकर्ते जगदीश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी कणकवलीत आणले. ग्लेज ट्रेडींग इंडिया प्रा.लिमिटेड या चेन मार्केटिंग कंपनी रेफरन्सच्या माध्यमातून युवकांना जाळ्यात ओढते. ऑफिस वर्क आहे असे सांगून युवकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप प्रवीण राणे या युवकाने केला. ग्लेज ट्रेडींग इंडिया या चेन मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या मनात कंपनीची महती अगदी ठासून भरली जाते. त्यामुळेच या कंपनीत पगार नव्हे तर कमिशन दिले जाते, असेही औरंगाबाद ईथे काम करणारे काही युवक सूर आळवताना दिसले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.