गो कोरोना…योगींचा धाडसी निर्णय..!

0
1351

लखनौ | प्रतिनिधी | दि. ०५ : उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. मास्क, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन ही त्रिसुत्री वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत.

सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. कोरोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील.

दरम्यान, लॉकडाऊनला विरोध करणारा महाराष्ट्रातली भाजपची नेतेमंडळी आता यावर काय प्रतिक्रीया देणार, याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.