…म्हणून केसरकर पालकमंत्र्यांवर नाराज ; संजू परब यांचा गौप्यस्फोट

0
613

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०५ : आमदार दीपक केसरकर यांच्याकडे सावंतवाडी शहराच्या विकासासाठी निधी मागितला होता. मात्र पालकमंत्र्यांशी केसरकर यांचे पटत नसल्यामुळे ते निधी देऊ शकले नाहीत. केसरकरांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांचे पालकमंत्री पद गेले. त्यामुळे सध्या ते अमावस्या-पौर्णिमेला मतदार संघात उगवतात. जर अशीच परिस्थिती राहिली तर त्यांची आमदारकीही जाईल, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते, नगराध्यक्ष संजू परब यांनी केली. तर पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर आपण नाराज असुन ते काम करत नसल्याच केसरकर खासगीत बोलतात असा गौप्यस्फोट संजू परब यांनी केला.

यावेळी न.प. चे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, अनिल सावंत, केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.