…तर ‘फिल्लम’ला रामराम करणार ‘हा’ दिग्गज अभिनेता..!

0
214

मुंबई | प्रतिनिधी | दि. ०५ : ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल नीधि मय्यम या राजकीय पक्षाचे संस्थापक कमल हसन यांनी एक खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे. राजकारण हे जनतेच्या सेवेचं एक उत्तम माध्यम आहे. अन् जनतेची सेवा करताना तर चित्रपटांचा अडसर होत असेल तर ते सिनेसृष्टीतून कायमची निवृत्ती घ्यायला तयार आहेत, असं घोषणा त्यांनी केली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका भाषणात कमल हासन यांनी आपल्या राजकीय भवितव्यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “मी देशातील त्या 30 टक्के लोकांपैकी एक होतो जे राजकारणापासून पुर्णपणे अलिप्त राहतात. परंतु परिस्थितीनं मला राजकारणात येण्यात भाग पाडलं. आता मी माझं पुर्ण लक्ष जनतेच्या सेवेसाठी केंद्रित करणार आहे. अन् हे कार्य करत असताना जर माझं फिल्मी करिअर आड येत असेल तर मी चित्रपटसृष्टी कायमची सोडून द्यायला तयार आहे. माझे विरोधक म्हणतायेत हा केवळ एक पब्लिसिटी स्टंट आहे. काही दिवसांनी मी राजकारणातून गायब होईन. आता जनताच ठरवेल कोणाला गायब करायचं ते.”

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.