रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक…!

0
2489

नवी दिल्ली : दि. ०७ : देशात दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. गेल्या २४ तासात देशात १ लाख १५ हजार ७३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी ५ एप्रिलला पहिल्यांदाच एक लाखांचा टप्पा पार करत सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ नोंदवण्यात आली होती. यासोबत देशातील रुग्णांची एकूण संख्या १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. मात्र, आता महाराष्ट्रासह अन्य राज्यांत वेगाने रुग्णवाढ नोंदविण्यात येत असून नवा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, देशातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ४७३ वर पोहोचली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.