परशुराम गंगावणे यांचे छायाचित्र पोस्टाच्या तिकिटावर 

0
2885

कुडाळ । प्रतिनिधी । दि. ८ : सन २०२१ चा पद्मश्री पुरस्कारप्राप्त ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला गेलाय. भारतीय पोस्ट खात्याने त्यांचे छायाचित्र असलेले तिकीट प्रसिद्ध केले आहे. सिधुदुर्ग विभागाचे डाक अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी परशुराम गंगावणे यांची भेट घेऊन त्यांना या ‘माय स्टॅम्प’ ची भेट देऊन त्यांचा गौरव केला. 

ठाकर लोककलाकार परशुराम गंगावणे यांना अलीकडेच त्यांच्या कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. ठाकर कलांगणच्या माध्यमातून त्यांनी पुरातन अशा ठाकर कलेचं जतन केलं आहे. गंगावणे यांना पदमश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सिंधुदुर्गच्या डाक विभागाने सुद्धा त्यांचा गौरव केला आहे. सिंधुदुर्ग डाक विभागाचे ए बी कोड्डा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी परशुराम गंगावणे यांनी उभारलेल्या ठाकर कलांगणला भेट दिली. परशुराम गंगावणे यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट त्यांनी गंगावणे यांना भेट देऊन त्यांचा गौरव केला. तसंच ठाकर कला आंगणची पाहणी करून ठाकर लोककलेचे जतन केल्याबद्दल गंगावणे यांच कौतुक केलं. यावेळी श्री. परब, सायली प्रवीण गंगावणे, चेतन गंगावणे, रमेश सावंत, प्रवीण गंगावणे, अनिल गंगावणे उपस्थित होते. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.