वेंगुर्लेत मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

0
743


वेंगुर्ले : गुढीपाडवा मराठी नववर्षाचे वेंगुर्ले वासीयांच्यावतीने शहरातून भव्य शोभायात्रा काढत स्वागत करण्यात आले. यावेळी वेंगुर्ले तालुक्यातील असंख्य नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी वेंगुर्ले शहरात वेंगुर्लेवासीयांच्यावतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभयात्रेचे शहरातील जेष्ठ मानकरी रवी परब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. ढोल ताशा व लेझीम पथक, आकर्षक चित्ररथ, बैलगाडी, विविध सामाजिक संस्था, आकर्षक वेषभूषा केलेली मुले- मुली, भगवे फेटे परिधान केलेले पुरुष व पारंपारिक वेशभूषेतील महिला मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या. ही शोभायात्रा बॅ. खर्डेकर महाविद्यालयाकडून सुरुवात करून श्री रामेश्वर मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी या शोभायात्रेत पालकमंत्री दीपक केसरकर, भाजप प्रदेश चिटणीस राजन तेली, नगराध्यक्ष राजन गिरप, सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, तहसीलदार शरद गोसावी, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल, स्नेहा कुबल, यांच्या सहित सर्व नगरसेवक विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नागरिक यांनी सहभाग घेतला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.