बँकेच्या एक्झॉस्ट फॅनला आग ; उडाला गोंधळ

0
245

देवगड | प्रतिनिधी | दि. ०८ : जामसंडे येथील बँकेच्या एक्झॉस्ट फॅनला अचानक आग लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. आज सायंकाळी ही घटना घडलीय.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या एक्झॉस्ट फॅनला आज सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना आज जामसंडे येथे घडली. जामसंडे येथे बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे नेहमीप्रमाणे बँक कर्मचारी आपले काम करत असताना सायंकाळच्या सुमारास काही तरी जळत असल्याचा वास येऊ लागला. म्हणून त्यांनी बँकेमधील सर्व संगणक युपीएस चेक केले. मात्र, कुठेच काही जळत असल्याचे दिसले नाही. अचानक बँकेच्या बाहेर इमारतीला बसविण्यात आलेल्या 3 एक्झॉस्ट फॅन पैकी यातील पहिल्या एक्झॉस्ट फॅन शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. मात्र प्रसंगावधान बँकेच्या मेन स्वीच बंद करत ही आग बँकेत असलेल्या अग्निशामक सिलेंडर ने तात्काळ विझविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला. मात्र या आगीमुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. ही बातमी पसरताच पोलीस विकास जाधव देखील तात्काळ घटनास्थळी हजर झाले. तोपर्यत ही आग विझविण्यात आली होती. मात्र बँकेला आग लागली समजताच साऱ्यांचीच तारांबळ उडाली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.