पालकमंत्री उद्या जिल्हा दौऱ्यावर..!

0
207

सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी | दि. ०८ : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे ९ एप्रिल २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे 

शुक्रवार ९ एप्रिल २०२१ ला दुपारी २.३० वा. हेलिकॉप्टरने पोलीस परेड ग्राऊंड, सिंधुदुर्गनगरी येथे आगमन व मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण

दुपारी २.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे परिवहन मंत्री यांचे समवेत जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक

दुपारी ३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांच्या समवेत जिल्ह्यातील कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाबाबत आढावा तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध संदर्भात आढावा बैठक

दुपारी ४.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी, अधिक्षक भूमि अभिलेख, सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, संबंधित जिल्हा जल संधारण अधिकारी, विभागीय पर्यटन अधिकारी, रत्नागिरी तसेच संबंधित अधिकारी यांच्या समवेत मौजे शिरोडा, ता. वेंगुर्ला येथील शिरोडा – वेळागर येथील ताज हॉटेलच्या जमीन मोजणीबाबत बैठक, मौजे मसुरे, ता. मालवण आंगणेवाडी येथील प्रस्तावित ल.पा. धरणामध्ये जाणाऱ्या जमिनीचा मोबदला दर निश्चित करणेबाबत बैठक, मौजे कुंभवडे ता. कणकवली येथील प्रस्तावित ल.पा.धरणामध्ये जाणाऱ्या जमिनीचा मोबदला दर निश्चित करणेबाबत बैठक. मौजे कुर्ली घोणसरी ता. कणकवली कालव्यासाठी जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत बैठक

सायं. ५.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, सोयीनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथून मोटारीने एम.आय.डी.सी, विश्रामगृह, कुडाळकडे प्रयाण, सोयीनुसार एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ येथे आगमन व राखीव

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.