सावंतवाडीच्या सुनबाईंचं सेट परीक्षेत यश..!

0
1292

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०८ : सहाय्यक प्राध्यापकपदासाठी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत सावंतवाडी येथील हेमश्री किशोर चिटणीस-मांजरेकर यांनी मराठी विषयात यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी युजीसी आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या या परीक्षेला सर्व विषयांसाठी ६१ हजार २१४ विद्यार्थी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून प्रविष्ट झाले होते. त्यातील फक्त ४ हजार ११४ (६.७३ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हेमलता या सुवर्णलता आणि काशिनाथ मांजरेकर यांच्या कन्या तर मनीषा आणि महेश चिटणीस यांच्या स्नुषा आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.