शामल मांजरेकर – पिळणकर ठरल्या ‘दि इन्फ्लुएन्शियल वूमन अचिव्हर ऑंफ इंडिया २०२०-२१’ पुरस्काराच्या मानकरी

0
394

सावंतवाडी : दि. ०८ : बीझटायकून मार्फत भारतातील विविध क्षेत्रातील अत्यंत प्रभावशाली व कर्तृत्ववान महिलांना ‘दि इन्फ्लुएन्शियल वूमन अचिवर अॉफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेंगुर्ला सुरंगपाणी केंद्रशाळेतील प्राथमिक शिक्षिका, लेखिका तथा संवेदनशील कवयित्री सौ शामल शंकर मांजरेकर- पिळणकर यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन सन २०२० – २०२१ चा हा मानाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरवपदक व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

यापूर्वीही सौ. मांजरेकर यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या या गौरवाबद्दल समाजातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.