कात्रजच्या घाटात अपघात ; सावंतवाडीतील दोघांचा मृत्यू ; एक गंभीर

0
4464

पुणे : कात्रजच्या घाटात सावंतवाडीतील दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यु तर, एक गंभीर जखमी झाला आहे. सावंतवाडीहून मुंबईला केळी घेवून निघालेला आयशर कँटर २०० फूट खोल दरीत कोसळला. आयशर मालक गजानन उर्फ बाबी राणे (वय -४२, रा. निरूखेवाडी – कोलगाव, ता. सावंतवाडी) आणि  चालक हर्षल गावडे (वय – ३६, रा. कारिवडे, ता. सावंतवाडी) हे दोघे जागीच ठार झालेत. लाखीये नामक क्लीनर (रा.कारिवडे) हा गंभीर जखमी झाला आहे. केळीने भरलेला ‘आयशर’ घेऊन मुंबईला जात होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजता कोलगाव – निरुखेवाडी येथून जायला निघाले. कात्रजच्या घाटात मध्यरात्री १ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने बचावलेल्या क्लीनर लाखीये याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे राणे आणि गावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती मिळाताच कोलगाव आणि कारिवडे येथील मित्रमंडळी कात्रजच्या दिशेने रवाना झाले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here