सिंधुदुर्गातील वाळूच्या डंपरचा गोवा प्रवेशाचा प्रश्न सुटला ; निलेश राणेंनी मानले गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार

0
408

सिंधुदुर्ग | दि. ०९ : सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांचा गोवा प्रवेशाचा २५ दिवस रखडलेला प्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या एका फोनवर सोडवल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी पणजी येथे भेट घेऊन आभार मानले.

दरम्यान, गोवा बांबुळी येथील मेडीकल कॉलेज मध्ये उपचारासाठी येणाऱ्या सिंधुदुर्गातील रुग्णांची अडचण होऊ नये, यासाठी गोवा सरकारच्या वतीने समनव्यक नेमण्याची मागणी श्री. राणे यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सिंधुदुर्गातील वाळूच्या गाड्यांना २५ दिवस गोव्यात नो एन्ट्री होती. त्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर सिंधुदुर्गातील वाळूचे डंपर पूर्वीप्रमाणे गोव्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे सिंधुदुर्गातील दोनशेहून अधिक वाळूव्यावसायिक व डंपरमालकांचा प्रश्न मार्गी लागला असून या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शुक्रवारी पणजी येथे भेट घेऊन आभार मानले.

यावेळी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, रणजित देसाई, बाबा परब, आनंद शिरवलकर, प्रितेश राऊळ आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.