दोन दिवस कडक लॉकडाऊन ; खरेदीसाठी सायंकाळी नागरिकांची मोठी गर्दी

0
763

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०९ : कणकवली बाजारात सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. उद्या शनिवार व रविवार या दिवशी संपूर्ण बाजार बंद असल्याने आज ग्राहकांनी बाजार खरेदी साठी गर्दी केली होती. कणकवली शहरात डी पी रोडला भाजीपाला मासे व चिकन तसेच किराणा मालाच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. सर्वजण बाजार खरेदी करून घरी जाण्याच्या गडबडीत असल्याचे दिसत होते.

सध्या सर्वच आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून मंगळवारचा आठवडा बाजार बंद असल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याची पाहायला मिळाली आहे. यावेळी खरेदी करताना नागरिक व व्यापारी यांनी मास्क चा वापर करणे बंधनकारक आहे. तसेच सोशल डीस्टन्स देखील राखणे गरजेचे आहे. पण याचे कोणतेही पालन होताना कणकवली शहरात दिसत नाही

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.