स्वॅब टेस्टींग सेंटरवर गर्दी ; शहरात शुकशुकाट

0
396

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १० : शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत राज्य शासनाने कडक संचारबंदी जाहीर केल्यानंतर आज पहिल्याच शनिवारी सावंतवाडीत अत्यावश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत विकेंड लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. यामुळे सर्वत्र शुकशुकाट होता.

शहरी भागात पोलीस येणारी जाणारी वाहने अथवा नागरिकांनाही अत्यावश्यक नसल्यास प्रवासास अटकाव करत होते. नाक्यानाक्यावर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. तर स्वॅब टेस्टींग सेंटरवर देखील नागरिकांनी टेस्टींगसाठी मोठी गर्दी केल्याच चित्र पहायला मिळाल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.