कुडाळ न.प.च्या ओपन जीमचा शुभारंभ ; नगरसेविका संध्या तेरसे यांचे प्रयत्न

0
368

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १६ : सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा विभागाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजने अंतर्गत (७ लक्ष) जिल्हा नियोजन समिती सदस्य, कुडाळच्या नगरसेविका सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या मागणी आणि पाठपुराव्याने कुडाळ नंगरपंचायतीस मंजूर ओपन जीमचा शुभारंभ हिंदु नववर्षाच्या सुरुवातीला हिंदु कॉलनी कुडाळ येथे कुडाळ नगराध्यक्ष सन्माननीय ओंकार तेली तसेच हिंदु कॉलनी मित्रमंडळ अध्यक्ष अशोक मालवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गिर्यारोहक व उत्कृष्ट खेळाडू डॉ. जयसिंह रावराणे तसेच उत्कृष्ट राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू सौ.अर्चना गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्यांच्या विषेश प्रयत्नातून सदर ओपन जीम मंजूर झाली त्या नगरसेविका सौ.संध्या तेरसे तसेच हिंदु कॉलनीतील रहिवासी उपस्थित होते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंस चे नियम पाळण्यासाठी कमीतकमी लोकांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष अशोक मालवणकर यांनी नगराध्यक्ष ओंकार तेली आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे हिंदू कॉलनीच्या वतीने आभार मानले.त्याच प्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांचे विषेश सहकार्य मिळाल्याबद्दल सौ तेरसे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.  गेली दोन वर्षे पाठपुरावा करून लहान थोर सर्वांनाच उपयुक्त असे ओपन जीम हिंदु कॉलनीमधे सुरू केल्याबद्दल कॉलनीतील रहिवासी विषेशतः महिला वर्गाने सौ संध्या तेरसे यांचे विषेश कौतुक आणि अभिनंदन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.