कोरोनास्थितीचा कणकवलीत पालकमंत्र्यांकडून आढावा ; दिल्या महत्वाच्या सूचना

0
764

कणकवली | प्रतिनिधी | दि. १७ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी कणकवली, देवगड, वैभववाडी, तालुक्यातील परिस्थिती बाबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सकाळी ११.४५ वा.आढावा बैठक पार पडली. या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करताना उपाय योजनां बाबत मार्गदर्शन केले.

या बैठकीत कोरोना विषयक आढावा घेताना अधिकार्‍यांकडून समस्या जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपायोजना आपण करू शकतो याबाबत माहिती जाणून घेतली. यात जिल्हा सीमेवर कशा प्रकारे नियोजन केले आहे. कोविड सेंटर मध्ये बेडची उपलब्धता किती आहे. त्यामध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधा कशा आहेत. पोलीस प्रशासनाने ही खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

तसेच तिन्ही तालुक्यात कोविड सेंटरची बेड वाढण्याबाबत सुचना केल्या. तसेच लसीकरणाची माहिती देऊन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सांगून कोविड सेंटरच्या आहारात वाढ केली असल्याचे सांगितले. त्यामुळे सिंधुदुर्ग वासीयांनी मागिल कोरोना काळात आतापर्यंत सहकार्य केले. तसेच सहकार्य पुढील काळात करावे असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

ही बैठक उपविभागीय अधिकारी, कणकवली, तहसिलदार कणकवली येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला आमदार वैभव नाईक,प्रांत वैशाली राजमाने ,तहसीलदार रमेश पवार,डी वाय एसपी नितीन कटेकर, गटविकास अधीकारी अरुण चव्हाण, कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे, तालूका आरोग्य अधिकारी संजय पोळ, पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, वैधकीय अधीकारी शिकलगार, डॉ टाक ,डॉ गणेश चौगुले उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.