वॉटर एटीएम घोटाळा दाबण्यासाठीच लोबोंवर खोटे आरोप : रुपेश राऊळ

0
245

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १७ : शिवसेना गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी वाॅटर एटीएममध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केले होता. हा आरोप संजू परब यांना का झोंबला ? असा सवाल शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. तसेच पालंकमंत्री निधी देत नसल्याचे वारंवार आरोप करत असलेले संजू परब यांनी काल पालकमंत्री निधी देतात हे स्वतः कबूल केले. तर त्या वाॅटर एटीएम बाबत आम्ही नक्कीच पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करून चौकशी लावणार असल्याचा इशारा रूपेश राऊळ यांनी दिला.

यावेळी ते म्हणाले की, वॉटर ए टी एम घोटाळा दाबण्यासाठीच ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांच्यावर कंपास पेटी घोटाळ्याचे खोटे आरोप करत आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी जिल्ह्यात कधीच ठेकेदारांंना कधीच जोपासले नसून, ठेकेदारांंना कोणी जोपासले ते सर्वांना माहीत आहे. असा जोरदार टोला लगावला आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवीका अनोरोजीन लोबो, नगरसेवीका भारती मोरे ,नगरसेवक सुरेंद्र बांदेकर,नगरसेवक बाबू कुडतरकर आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.