कोव्हीड सेंटरमधील रुग्णांची गैरसोय थांबणार ; स्थानिक आमदार, प्रशासकीय अधिकारी लक्ष घालणार का ?

0
364

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १७ : सावंतवाडी तालुक्याची हेल्पलाईन असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातल भीषण वास्तव सिंधुदुर्ग लाईव्हनं ग्राउंड रिपोर्ट करत समोर आणल होत. थेट कोव्हीड सेंटरमध्ये जात कोव्हीडबाधित रूग्णांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली होती. या कोव्हीड सेंटरमधील भीषणता समोर आली.

यानंतर येथील प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी कामाला लागले असून पाण्याचा प्रश्न, सफाईचा प्रश्न, स्टाफची कमतरता याबाबत आज वैद्यकीय अधिक्षक डॉ.‌ उत्तम पाटील यांची भेट घेत विचारणा केली असता नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडवला जात आहे. तर सफाई कामाची टेंडर न भरल्यानं कामगारांची कमतरता आहे. सध्या काही लोकांकडून ही साफसफाई करून घेतली जात आहे. तर लवकरच हे कोव्हीड सेंटर आयुर्वेदिक महाविद्यालयाचे इमारतीत हलवल जाणार असून हेल्थ पार्क, भोसले नॉलेज सिटी इथं कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. उत्तम पाटील यांनी दिली.

यावेळी या कोव्हीडबाधीत रुग्णांच्या प्रश्नांसाठी लढा देणारे ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ट्रस्टचे प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनीही वैद्यकीय अधिक्षकांची भेट घेत त्यांच्या निर्णयाचं स्वागत केले. तर कोव्हीड केअर सेंटरमधील रूग्णांकडून देखील समाधान व्यक्त केल जात आहे.

स्थानिक आमदार, प्रशासकीय अधिकारी लक्ष घालणार का ?

दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थिती सांभाळण्यासाठी गठीत केलेली रूग्ण कल्याण नियामक समिती रुग्णांना सुविधा देण्यासाठी उपाययोजना करणार का ? स्थानिक आमदार, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर प्रशासनाकडून याचा आढावा घेणार का ? तर या समितीत असणारे जिल्हा शल्य चिकित्सक, प्रांताधिकारी, आमदारांचे प्रतिनिधी, सभापती तहसीलदारांचे प्रतिनिधी, शहराचे मुख्याधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत रूग्णांची गैरसोय थांबणार का ? हे पाहणं गरजेचं असणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.