देवगडात आज कोरोनानंं एकाचा मृत्यू..!

0
592

देवगड | प्रतिनिधी | दि. २६ : देवगड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. देवगड तालुक्यात आज एकूण 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात देवगड तालुक्यात एक मृत्यू झाला आहे.यामुळे देवगड तालुक्यातील कोरोना रुग्णांची आतापर्यंतची आकडेवारी 1120 वरून 1126 च्या घरात पोचली आहे.

आजच्या स्थितीत देवगड तालुक्यात 380 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सक्रिय असून ते उपचार घेत आहेत. आज कोरोना रुग्णांमध्ये कुणकवन येथील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे त्याना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास होता. कोरोनामुळे आतापर्यत देवगड तालुक्यात 27 जणांचा मृत्यू झाला . ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.