वी फाॅर यू तर्फे अनोखी स्पर्धा..!

0
204

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०१ : आपल्या पृथ्वीसाठी हानिकारक असलेल्या अविघटनशील वस्तूंचा वापर आपण पूर्णपणे बंद तर नाही करू शकत मात्र या वस्तूंचा पुर्नवापर करून त्यापासून नाविन्यपूर्ण दैनंदिन जीवनातील वस्तू तसेच पुर्नवापराच्या दृष्टीने उपयुक्त व ज्याचा भविष्यात देखील वापर करता येईल अशी माॅडेल्स/वस्तू नक्कीच बनवू शकतो. हेच उद्दिष्ट समोर ठेवून “वी फॉर यू” या संस्थेने “ग्रीन ड्रीम”या Online स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

यामध्ये स्पर्धकांनी प्लास्टिक सारख्या अविघटनशिल वस्तूंचा पुनर्वापर करून दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरतील अशा वस्तू बनवायच्या आहेत व त्यासोबतचा आपला फोटो व कृती व्हाॅट्सॲप वर पाठवायची आहे. 13 मे 2021 पर्यंतच या वस्तू स्विकारण्यात येतील व 15 मे 2021 ला निकाल जाहीर केला जाईल. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन”वी फॉर यू” संस्थेतर्फे करण्यात आले आहे. यातील निवडक मॉडेल्स *महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला* पाठविण्यात येणार आहेत.

खालील Whatsaap Number वर फोटो आणि व्हिडीओ पाठवावेत.
कु. दिप्ती रवींद्र पंडित :- ८२७५३८०६६१

अधिक चौकशी साठी संपर्क :-
१) दिप्ती पंडीत :- ८२७५३८०६६१
२)राहुल तांबोळकर :- ९४२०७२५६८६
३) सर्वेश राऊळ :- ९१४५३५९०५७

स्पर्धेतील विजयी स्पर्धकास सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देण्यात येईल तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.