आरे येथे २६ वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

0
626

देवगड : तालुक्यातील किंजवडे खालचीवाडी येथील २६ वर्षीय नवविवाहिता अंजली उर्फ काजल रवींद्र कांबळी ही आपल्या नवऱ्यासह विरार पालघर येथे वास्तव्यास होती १२ जुलै रोजी ती शेतीच्या कामासाठी आपल्या किंजवडे खालचीवाडी येथे माहेरी आपल्या पतीसह आली होती .आज सकाळी११:३० वाजता तिच्या आईने तिला आरे देवभाटी येथे सासरी आणले व आई शेतीच्या कामासाठी गेली वडिलांनीही आपल्या घरी आलेल्या मुलीची चौकशी केली व ते शेतात गेले एक तासाने १२:३० वाजता शेतातून आई व वडील परत आले असता मुलीला हाक मारली, घराचा दरवाजा उघडा दिसला पुढे येऊन पाहिले असता मुलीने ओढणीने गळफास लावुन आत्महत्या केलेली दिसली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर मुलीचे वडील नामदेव गंगाराम मुणगेकर यांनी देवगड पोलिसात दिली असून याबाबत रीतसर पंचनामा करून आकस्मिक मृत्यू अशी नोंद पोलिसांनी केली आहे. याबाबतचा अधिक तपास देवगडपोलीस उपनिरीक्षक गोविंद वारंग करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.