दिलासादायक ! सलग तिसऱ्या दिवशी करोनाच्या नवीन रुग्णांच्या संख्येत घट

0
1132

नवी दिल्ली | दि. ०४ : देशात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. आता दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून देशातील करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे.

भारतात एका दिवसात विक्रमी ३.१८ लाख नागरिक करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जगात कुठेच एकावेळी इतक्या संख्येत नागरिक बरे झालेले नाहीत. सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी करोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ५५ हजार ६८० जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ३० एप्रिलनंतर करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.