#IPL ; कोरोनाचा धोका वाढला ; IPL रद्द

0
842

नवी दिल्ली | दि. ०४ : यंदाच्या वर्षीची आयपीएल क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशात कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमध्येही काही रुग्णांना या विषाणूची लागण झाल्यामुळं हा निर्णय़ घेण्यात आल्याचं कळत आहे.

बायो बबल, सातत्यानं होणाऱ्या कोरोना चाचण्या आणि प्रत्येक पावलावर सावधगिरी बाळगूनही आयपीएल स्पर्धेत कोरोना विषाणूनं शिरकाव केलाच. खेळाडूंच्या मनात असणारी भीती सार्थ ठरली आणि कोलकाता संघातील काही खेळाडूंना या विषाणूची लागण झाली. सोमवारी यासंदर्भातील माहिती समोर आली. ज्यामुळं कोलकाता विरुद्ध बंगळुरु हा सामना रद्द करण्यात आला. तर, संघातील इतर खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय़ घेतला गेला. आयपीएलमध्ये कोरोनानं शिरकाव करण्यापूर्वीच काही परदेशी खेळाडूंनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत चिंतेचा सूर आळवत या स्पर्धेतून माघारही घेतल्याचं पाहायला मिळालं. आता मात्र हे संकट आणि अधिकाधिक खेळाडूंना होणारी कोरोनाची बाधा पाहाता बीसीसीआयकडूनच ही स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं वृत्त एएनआयनं प्रसिद्ध केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.