सिम्टमेटीक पेशंटची तालुक्यात तातडीनं सोय करा : अँड. परिमल नाईक

0
271

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०४ : कोविड टेस्ट रिपोर्ट मिळण्यासाठी चार चार दिवस लागत असल्यामुळे रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ऍडमिशन मिळत नसून त्यांना शीघ्र गतीने कोविड उपचार मिळत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे. रिपोर्ट मिळेपर्यंत बाह्य रुग्ण कक्षात राहावं लागतं असून कोव्हीड रुग्ण उपचाराविना ताटकळत आहे. परिणामी रुग्णांवर आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तसेच सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग यांच्या खेरीज अन्य शासकीय हॉस्पिटलमध्ये रेमडिसिव्हर इंजेकशन उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तातडीची वैद्यकीय सुविधा रुग्णांना मिळत नाही. त्यामुळे कोरोना टेस्ट रिपोर्ट व सिम्पमेटीक रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं उपचार करण्याची सुविधा उपजिल्हा रुग्णलयत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजी आरोग्य सभापती अँड. परिमल नाईक यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.