लाकडी खेळण्याचे उद्योजक भाई काणेकर यांचं निधन

0
691

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०४ : सावंतवाडीतील सुप्रसिद्ध लाकडी खेळण्याचे उद्योजक शिवराम उर्फ भाई काणेकर यांचे कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरपालिकेचे आरोग्य सभापती म्हणून त्यांनी काम केले असून तीना वेळा नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते. लाकडी खेळण्याना जगात प्रसिद्धी मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली, २ पुतणे असा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांचे ते मामा होत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.