…अन्यथा आंदोलन !

0
255

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०४ : फोंडाघाटसोमवार पासून कणकवली तालुक्याचा फोंडाघाट गावात ७ दिवसाचा “जनता कर्फ्यू ” सुरू झाला. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रस्ते- बांधकाम विभागाने आपली पोळी भाजून घेतली. सोमवारी सर्व दुकाने व्यवसाय बंद असताना, व्यावसायिक आपापल्या घरी कुटुंबात रममाण झालेले असताना, स्थानिक नेत्यांचे कुठलेही नियंत्रण नसताना, गेल्या वर्षी मे महिन्यात रस्त्यावर शेवटचा राहिलेला डांबर कोट, फोंडाघाट बाजारपेठेतील रस्त्यावर लोरे चौक ते ग्रामपंचायत पर्यंत घाईघाईने मारून घेतला. बेवारस गांवात यावेळी ना अधिकारी उपस्थित होता ना स्थानिक नेते ! गडबडीत मारलेल्या या कामात डांबरा वरील कमी प्रमाणाच्या ग्रिट मुळे दुसऱ्या दिवशी सूर्य वर येतात सर्व डांबर चकाकू लागले. ग्रिट बाजूला झाली. आणि वाहने रुतू लागली. वाहनांच्या चाकाखाली भाग खडी- डांबराने भरून गेला. पादचाऱ्यांच्या चपलांना लागलेल्या डांबर- ग्रिट च्या चिखलांत मुळे लाखोल्यांचे संतापजनक शब्द कानावर येत होते. वस्तुतः जनता कर्फ्यू असताना आणि सर्व व्यवहार बंद असताना ह्या “भीक नको पण कुत्रे आवरsss”- सारख्या कामाला कोणी परवानगी दिली? कि अर्थपुर्ण व्यवहारात ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा हा भाग आहे ,याचा संताप फोंडाघाट बाजारपेठेतून व्यक्त होताना दिसत होता. तातडीने या डांबरावर योग्य ती उपाययोजना करुन बाजारपेठेतील पादचारी, ग्रामस्थ, व्यावसायिक व वाहनधारकांचा त्रास त्वरित कमी करावा, अशी तीव्र मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.