महाचॅनेलचे मिशन लसीकरण रजिस्ट्रेशन ;  मंगळवारी ३६ जणांची नोंदणी

0
248

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |  दि. ४ : १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोव्हीडची लस द्यायला आज सिंधुदुर्गात सुरुवात झाली. रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांनाच हि लस देण्यात येते. मोबाईल वर किंवा संगणकाच्या माध्यमातून हि नोंदणी केली जाते. पण सर्वांकडे हि सुविधा असतेच असे नाही. त्याचबरोबर सुविधा असली  तरी नोंदणी कशी करायची याचे ज्ञान नसते. अशा लोकांच्या मदतीला आहे कोकणचे महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह. सिंधुदुर्ग लाईव्हने सुरु केलेल्या   ‘लसीकरण रजिस्ट्रेशन तुमचं मिशन सिंधुदुर्ग लाईव्हच’ या उपक्रमाला मंगळवारी  देखील फार चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी दिवसभरत सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रतिनिधींकडे ३६ जणांनी नोंदणी केली. गेल्या दोन दिवसात एकूण १२९ जणांनी नोंदणी केली आहे.
कोव्हीडच्या या दुसऱ्या लाटेत सुद्धा कोकणचे महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हने आपली  सामाजिक बांधिलकी जपली आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या मिशन रजिस्ट्रेशन फॉर व्हॅक्सिनेशन या नव्या मिशनला महाराष्ट्र दिन पासून सुरवात झाली. यात १८ ते  ४४ वयोगटातल्या लसीकरणासाठी लोकांचे रजिस्ट्रेशन केले जात आहे. या मिशनला जिल्ह्यातून फार चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला जात आहे. आमचे प्रतिनिधी सुद्धा लोकांना लसीकरण नोंदणी साठी सहकार्य करत आहेत.
मंगळवारी   सिंधुदुर्ग लाईवच्या प्रतिनिधींकडे एकूण ३६ जणांनी नोंदणी केली. यामध्ये देवयानी वरसकर – ४,  कृष्णा ढोलम – १०, रुपेश पाटील -१०, स्वप्नील लोके – ०८ आणि श्रीधर साळुंखे – ४ अशी नोंदणी झाली आहे. सिंधुदुर्ग लाईव्हचे हे मिशन सुरू राहणार असून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी आमच्या पुढील प्रतिनिधींशी संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. संपर्क – देवयानी वरसकर – ९५६१७७८६८६ ; कृष्णा ढोलम – ९४०५८७००७१ ; स्वप्नील लोके – ९४०५६०७८३० ; श्रीधर साळुंखे – ९४०४१६६२५७ ; प्रा. रुपेश पाटील – ७९७२७७५४५९. दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी ४ मे पासून लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.