वेंगुर्लेतही १० दिवसांचा जनता कर्फ्यू

0
518

वेंगुर्ले | प्रतिनिधी | दि. ४ : आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथील तहसीलदार कार्यालयात झालेल्या मिटींग मध्ये वेंगुर्लेत ६ ते १५ मे दरम्यान जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे हा जनता कर्फ्यू होणार आहे.

दूध विक्री फक्त सकाळी ६ ते ९ पर्यत राहाणार सुरू राहून इतर सर्व आस्थापने बंद रहातील. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट होणार आहे. सध्या आंबा हंगाम असल्याने आंबा काढणी, विक्री, वाहातुकीस मुभा असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी दोन दिवसात अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करावी. या मिटींगला नगराध्यक्ष दिलीप गिरप, विभागिय पोलीस अधिकारी, प्रांत सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रविण लोकरे, गट विकास अधिकारी उमा पाटील, मुख्य अधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, तालुका वैद्यकीय अधिकारी माईणकर- सामंत, डॉ. अतुल मुळे, तालुक्यातील काही निवडक सरपंच, सर्व पक्षाचे तालुका प्रमुख, व्यापारी आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.