मुलाच्या अकाली एक्झिटनं वडिलांचे निधन

0
4388

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ४  : विवाहित तरुण मुलाचा मृत्यू जिव्हारी लागल्याने अवघ्या आठ दिवसातच वडिलांनीही मृत्यूला कवटाळले. सांगेली सावरवाड येथील पवार टेंब येथील पवार कुटुंबीयांवर हा मोठा आघात झाला आहे. मुलगा व वडील अशा एकाच कुटुंबातील दोघांचा अवघ्या आठ दिवसांच्या फरकाने मृत्यू झाल्याने सावरवाड गावात शोककळा पसरली आहे.

रावजी विश्राम पवार (वय 68) तर मुलगा आनंद रावजी पवार (वय 35) असे या दोघांची नावे आहेत. मुंबई विरार येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. त्यांचे मुळगाव सावरवाड असून गेल्या आठ दिवसांपूर्वीच आनंद रावजी पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मुलाला अग्नी दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच वडील रावजी पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. मुलाच्या अचानक जाण्याने वडील व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तरुण होतकरू मुलाच्या अशा अचानक जाण्याने वडील रावजी यांनी धास्ती घेतली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.