निष्काळजी लाभार्थ्यामुळे कोविडचे 9 डोस वाया

0
801

देवगड | प्रतिनिधी | दि. ४ : 18 ते 44 वयोगटातील कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला.  आज 91 जणांनी देवगड ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केले. मात्र धक्कादायक बाब अशी की यातील 9 लस लाभार्थीच उपस्थित नसल्याने वाया गेल्या आहेत.

यामध्ये कोटकामते येथील 2, कणकवली येथील 3 , फणसगाव येथील 2 तर देवगड येथील 2 लाभार्थी आहेत ते सांगलीला गेल्याने त्यांचे लसीकरण डोस वाया गेले. जर ऑनलाइन पध्दतीमध्ये थोडा बदल करण्याचा अधिकार त्या त्या स्थनिक आरोग्य विभागाला दिले असते तर हे 9 डोस वाया गेले नसते. ऑनलाईन लसीकरण बुकिंग मध्ये 9 ते 5 या वेळेत लसीकरण केले जाते जर लाभार्थी उपस्थित नसतील तर ते डोस वाया जाऊ नयेत म्हणून दुसऱ्या लाभार्थी यांना मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी यासाठी 4 ते 5 या वेळेत स्पॉट रजिस्ट्रेशन उपलब्ध करावे जेणेकरून वाया जाणारे डोस तरी वाचतील अशी मागणी होत आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.