अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू ; कार चालकावर गुन्हा दाखल

0
2947

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०४ : मुंबई गोवा महामार्गांवरील जानवली येथे सोमवारी दुचाकी व कार या दोन वाहनांमध्ये अपघात झाला होता. यात जखमी दुचाकी चालक सत्यवान नारायण नाटळकर (५०) यांचा मृत्यू झाला . या प्रकरणी कार चालक तेजस सागर घाडीगावकर (३४ रा. कुवळे, देवगड) याच्याविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी चालक सत्यवान नाटळकर हे तळरेहून नाटळ येथे येत होते. वाटेत जानवली येथील पेट्रोप पंपावर जाण्यासाठी वळत असताना मागून आलेल्या कार ने धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी सत्यवान नाटळकर यांना अधिक  उपचारासाठी  कोल्हापूर येथे हलवीत  असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कार चालक तेजस घाडीगावकर याने रस्त्याच्या विशिष्ट  परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने गाडी चालून  त्याच्या मृत्यूस करणीभूत ठरल्या प्रकरणी त्याचावर गुन्हा नोंद कारण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.