जिल्हाधिकाऱ्यांच्या बदली बनावट आदेशाच कोल्हापूर कनेक्शन ?

0
267

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०४ : जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे बनावट आदेश काढल्याप्रकरणी रत्नागिरीमध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती ही कोल्हापुरातील असल्याचे समजते. संबंधिताला सिंधुदुर्ग पोलिसांनी ही ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी व्हायला हवी.तसेच या पाठीमागे सिलिका मायनिंगचे बनावट पास बनविण्याचे कोल्हापूर कनेक्शन नाही ना, याचाही तपास व्हायला हवा अशी मागणी मनसे नेते, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

श्री. उपरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे खोटे आदेश काढल्याप्रकरणी आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे ही तक्रार केली आहे. ही त्या रजिस्टर करण्यात आली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची ही बदली झाल्याचे खोटे आदेश निघाले होते. यात रत्नागिरी पोलिसांनी कोल्हापूर येथील एकाला अटक केल्याची समजते. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचीही बदली केल्याचे खोटे आदेश काढण्यात आले असल्याने आपण दिलेल्या तक्रारीनुसार याप्रकरणी संबंधिताला सिंधुदुर्ग पोलिसांनी ही ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्याची गरज आहे. या पाठीमागे कोण राजकीय व्यक्ती की अन्य कोण आहे, याचाही शोध घ्यायला हवा असेही श्री उपरकर यांनी यांनी म्हटले आहे.

तसेच ज्या व्यक्तीला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली ती संबंधित व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याचे समजते. अशाप्रकारे जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचे बनावट आदेश एवढे हुबेहूब तयार करण्यात येत असल्याने या पाठीमागे नेमके काय आहे याचा शोध व्हायला हवा? कारण सिंधुदुर्गमध्ये ही गेल्या काही कालावधीत अशाच प्रकारे सिलिका मायनिंग बाबत बनावटी पास तयार करून त्याचा वापर केला गेला. हे पास ही कोल्हापूर कनेक्शनशी संबंधित आहेत का? व यात कोण अधिकारी पदाधिकारी सहभागी आहेत का? याचाही तपास व्हायला हवा अशी मागणी श्री उपरकर यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.