मारहाणप्रकरणातून ऐनारीतील तिघांची जामीनावर सुटका..!

0
130

वैभववाडी : पुर्ववैमन्यस्यातून झालेल्या मारहाणीतून ऐनारी चाळकेवाडीतील तिघांची जामीनावर सुटका झाली. संशयित आरोपी यांच्यावतीने अँड.अजितसिंह काळे यांनी युक्तिवाद केला.

ऐनारी येथील सचिन गुरव यांना पुर्वीच्या वादातून ऐनारी येथील धर्मेंद्र चाळके, संतोष चाळके, नितीन मांडवकर यांनी मारहाण केली होती. हा प्रकार १ मार्च २१ रोजी घडला होता.याप्रकरणी सचिन गुरव यांनी पोलीसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित तीघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा सर्व तपास करून पोलिसांनी संशयित आरोपींना आज ४ मे रोजी न्यायालयात हजर केले.

मारहाण करून गंभीर दुखापतीस कारणीभूत झाल्याच्या आरोपावरून या तिन्ही आरोपींची जामीनावर सुटका झाली आहे.आरोपींचे वकील अजितसिंह विठ्ठलराव काळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून कणकवली न्यायालयाने तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता केली .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.