कणकवलीत आज मिळाले एवढे रुग्ण..!

0
3366

कणकवली | प्रतिनिधी | दि. ०४ : कणकवली तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात १ मे ते १० मे पर्यंत जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज तालुक्यात ५३ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, हरकुळ येथील ६८ वर्षीय पुरुष आणि कलमठ येथील ६५ वर्षीय महिलेला समावेश आहे.

गावनिहाय आढळलेले रुग्ण पुढीलप्रमाणे, कणकवली शहर ११, हळवल ४, कुंभवडे १, नाटळ १, हरकुळ बुद्रुक ३, घोणसरी १, फोंडा ११, कळसुली २, शिवडाव ३, ओटव ४, शिडवणे १, कसवण १, ओसरगाव २, जानवली २, भिरवंडे २, कलमठ ३, खारेपाटण १. असे एकूण आज ५३ नवे रुग्ण आढळले आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.