राज्यपालांनी केलं उदय सामंतांचं कौतुक..!

0
409

नांदेड | प्रतिनिधी | दि. 04 : आज एक राजकिय चमत्कार महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात पहायला मिळाला. नांदेड विद्यापिठाच्या दिक्षांत सभारंभात चक्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं तौंडभरून कौतुक केलंय. गेल्या दिडवर्षात राज्यात शिवसेन विरुद्ध राज्यपाल असा राजकिय संघर्ष सातत्याने पहायला मिळतोय. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि शिवसेनेचं नातं हे विळ्या-फोपळ्याचं नातं आता सर्वांनाच चांगलंच माहीती झालंय. अशातच नांदेड विद्यापिठाच्या दिक्षांत सभारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी जाहीरपणे थेट शिवसेनेचे दिग्गज मंत्री उदय सामंत यांचं तौंडभरून कौतुक केलं. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्याच्या राजकिय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरू झालीय. राज्यपाल आणि शिवसेनेचं नातं आता संघर्षाकडून समझोत्याकडे तर जात नाहीयेना अशी शंकाही काही राजकिय वर्तुळाच विचारली जातेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.