भीषण ! कार – दुचाकीत अपघात ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

0
2278

कणकवली | प्रतिनिधी | दि. 06 : कणकवली वरून देवगड च्या दिशेनं जाणाऱ्या एक्टिवा गाडी व कोल्हापूर वरून गोव्याच्या दिशेने जाणारी कार या दोघांमध्ये नांदगाव सर्विस रोड क्रॉस करत असताना सकाळी नऊच्या दरम्यान हा अपघात घडला असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याला अधिक उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेले समजत असून कार कार वेगात असल्याने दुचाकी कार मध्ये अडकून फरफटत गेल्याचे समजतंय. हा अपघात नांदगाव ब्रिज अलीकडे जो मिडल कट आहे त्या मिडल कट क्रॉस करून सर्विस रोडला  जाताना झाला असल्याचे बोलले जात आहे.

नांदगाव येथील ग्रामस्थांनी लगेच हायवे ठेकेदार कंपनीला नांदगाव ब्रिज बंद करण्यात सूचना दिल्या आहेत. अन्यथा आपण आंदोलन करू असा इशारा दिला आहे. यावेळी नांदगाव शिवसेने शाखा प्रमुख राजा म्हसकर, भाई मोरजकर ग्रामस्थ आदम साठविलकर, भुपी मोरस्कर, प्रफुल तोरसेकर , बाळा सातवसे, जाफर बचावले, बाळा मोरये, पंढरी वायंगणकर उपस्थित होते.
हा अपघात एवढा भयंकर होता की एका बाजूला हेल्मेट पडले होते तर गाडी दुचाकी आणि कार एकमेकांमध्ये अडकलेले दिसले. कारमधील चालकालाही  किरकोळ दुखापत झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.