फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपकडून ‘जीएमसी’ला 75 आॅक्सिजन कॉन्संट्रेटर्स ; मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी खास व्टिट करून मानले आभार

0
400

पणजी | प्रतिनिधी | दि. ०७ : कोणत्याही सामाजिक अथवा नैसर्गिक आपत्तीत नेहमीच भरीव मदत करण्या-या गोव्यातील प्रसिध्द फोमेंतो रिसोर्सेस ग्रुपनं कोविडविरोधातल्या लढयासाठीही मोठी मदत केली आहे. सध्या आॅक्सिजनचा होणारा तुटवडा लक्षात घेता फोमेंतो रिसोर्सेसनं आपल्या सीएसआर फंडातुन 75 आॅक्सिजन कॉन्संट्रेटर्स जीएमसीला दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी खास व्टिट करून आभार मानतानाच या मदतीमुळं कोविडविरोधातल्या राज्याच्या लढयाला ताकद आल्याचं खास नमुद केलंय.

कोविडची साथ देशात आल्यावर गेल्या वर्षी याच दिवसात देशभरात लाॅकडाऊन घोषित करण्यात आलं होतं. सर्व उद्योग, रोजगाराची साधनं अचानक बंद झाल्यामुळं देशावर आणि पर्यायानं गोवा राज्यावर मोठं संकट आलं होतं. अनेक परप्रांतीय कामगार व कष्टकऱ्यांची उपासमार होत होती. त्यामुळं फोमेंतो समुहानं खास यंत्रणा उभारून गोवा तसंच सिंधुदुर्ग जिल्हयात अन्नदान केलं होतं. अनेक गरजु कामगारांनी त्यांचा लाभ घेतला होता. याही वेळेस फोमेंतो समुहाच्या वतीनं 75 आॅक्सिजन कॉन्संट्रेटर्स जीएमसीला देण्यात आले आहेत. दरम्यान, यामुळं निश्चितच आरोग्य यंत्रणेची ताकद वाढली असुन कोविडविरोधातल्या राज्याच्या लढयाला बळ मिळाल्याचं मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी म्हंटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.