माजी सैनिक रामचंद्र पवार यांचे दुःखद निधन

0
392

सावंतवाडी : माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार वय 83 यांचे दीर्घ आजारानंतर नुकतेच दुःखद निधन झाले मूळ सातार्डा गावचे रामचंद्र पवार हे बेळगाव कर्नाटक येथे स्थायिक झाले होते बेळगाव येथील सैन्य छावणीत त्यांनी 20 वर्षे सेवा बजावली.शिवभक्त असलेले रामचंद्र पवार यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे आडेली हायस्कूलचे शिक्षक संतोष पवार व वेंगुर्ला येथील सिव्हिल इंजिनियर नीलकंठ पवार यांचे ते वडील होत तर वेंगुर्ले पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर त्यांचे जावई होत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.