गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने केला जाहीर निषेध

0
1414

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १० : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे एकमेकांची शत्रू असलेली राष्ट्रही एकमेकांना मदतीचा हात देत आहेत. तर दुसरीकडे आपल्या शेजारील राज्याचा माजी मुख्यमंत्री सिंधुदुर्गाला ऑक्सिजन सिलेंडर दिले म्हणून मुख्यमंत्र्यांवर आरोप करतोय. आजपर्यंत गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध स्नेहाचे राहिलेले आहेत. किंबहुना सिंधुदुर्ग हा गोव्याचाच भाग असल्यासारखे वातावरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता असल्याने नारायण राणे यांनी गोवा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांना ऑक्सिजन सिलिंडर मिळण्यासाठी विनंती केली.

खरंतर गोव्यातही मुबलक सिलिंडर आहेत असा भाग नाही, परंतु डॉ प्रमोद सावंत यांनी शेजारधर्माच्या नात्याने, तातडीची गरज म्हणून काही सिलिंडर पाठवण्याची व्यवस्था केली. या गोष्टीचे गोवा काँग्रेस कडून राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्र्यांना या विषयावरून लक्ष्य करणारे दिगंबर कामत यांचा भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जाहीर निषेध केला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.