वैभववाडीत आज मिळाले एवढे CORONA चे रुग्ण

0
593

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. 11 : तालुक्यात आज १७ जणांचे कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आले आहेत.तसेच दहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील कुर्ली ४,नाधवडे ५,वैभववाडी ३,तिथवली-१,जांभवडे २ याठिकाणी हे रुग्ण सापडले आहेत.

सद्यस्थितीत ९४ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ३९ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तालुक्यात हाँटस्पाँट ठरलेले दोन्ही गाव कोरोनामुक्त होत आहेत. दिगशी पाठोपाठ सोनाळी गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. तालुक्यातील रुग्ण संख्याही आटोक्यात येत असल्याने आरोग्य विभागासमोरील चिंता थोडी कमी झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.