कुटुंबाच्या साथीमुळेच समर्पितपणे रुग्णसेवा – आर्या कोरगावकर

0
990

देवगड | प्रतिनिधी | दि. १२ : मागील वर्षीपासून जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजविला आहे. वैभवसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था अपुरी आहे, तरी सुद्धा  जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा जिल्हा कोरोना मुक्त व्हावा यासाठी कोरोनाशी कडवी झुंज देत आहे.  जिल्ह्याच्या  आरोग्ययंत्रणेतील महत्वाचा दुवा अर्थात सिस्टर (परिचारिका). आज परिचारिका दिनाच्या निमित्ताने आपले कुटुंब सांभाळून रुग्णसेवेचे व्रत अविरतपणे जपणाऱ्या शिरगाव प्राथमिक आरोग्य कैद्राच्या आरोग्य सहाय्यीका आर्या कोरगावकर यांच्या कार्याला सलाम.


मालवण तालुक्यातील मूळ चिंदर येथील पूर्वाश्रमीच्या  रुपाली आनंद लाड, देवगड येथील सामाजिक कार्यकर्ते दिवंगत विनायक कोरगावकर यांच्या स्नुषा व देवगड येथील बांधकाम व्यवसायिक अनिल कोरगावकर यांच्या पत्नी आर्या अनिल कोरगावकर या प्रामाणिकपणे आपले रुग्णसेवेचे काम बजावत आहेत.  सासरची माणसे, आईवडील, पती अनिल कोरगावकर यांनी वेळोवेळी त्यांना आणि त्यांच्या कार्याला प्राथमिकता दिली.  तसेच त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी देखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि साथ दिली. त्यामुळे या संकटाच्या काळात लोकांची सेवा करण्यास हुरूप आणि धीर आला. म्हणूनच या जीवघेण्या साथीमध्ये प्रत्येक कसोटीच्या क्षणी त्या पूर्ण समर्पित वृत्तीने रुग्णसेवा करू शकल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.