रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघ, युवा रक्तदाता संघटनेचा पुढाकार

0
345

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १२ : सावंतवाडी तालुका पत्रकार संघ आणि युवा रक्तदाता संघटना (देव्या सुर्याजी गृप) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार संघाने आयोजित केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. युवा रक्तदाता संघटना, देव्या सुर्याजी यांच कार्यही कौतुकास्पद आहे अशा शब्दात नगराध्यक्ष संजू परब यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत, राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक, सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण मांजरेकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार संतोष सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार सघ खजिनदार रामचंद्र कुडाळकर, आशुतोष चिटणीस, सुनिल कविटकर,ओंकार सावंत,सुनिल मिशाळ, मेहर पडते, गौतम माठेकर, वसंत सावंत, अनिकेत पाटणकर, राघवेंद्र चितारी, देवेश पडते, अभिजीत गवस, संदिप निवळे, पंकज तुळसुलकर, निखिल सावंत, अर्चित पोकळे, साईश निर्गुण,पांडुरंग वर्दम आदी युवा रक्तदाता संघटनेचे पदाधिकारी, तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी रक्तपेढीचे डॉ. सुशांत वराडकर, प्राजक्ता रेडकर, अनील खाडे, सुजाता बागेवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.