स्थानिक आंबा बागायतदार मेटाकुटीस

0
592

कुडाळ : दि. १२ :  लाॅकडाऊन काळात स्थानिक बाजारपेठेत आंबा विक्रीला प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वेंगुले तालुक्यातील वजराट येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार विकास नारायण चव्हाण यांनी केली आहे. आम्ही जिल्हातील असूनही गोव्यात आंबे विक्रीची पाळी आली आहे. अशी खंत विकास चव्हाण यांनी सिंधुदुर्ग लाईव्ह जवळ व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व्यावसायीकांना लाॅकडाऊनचा मोठा फटका बसताना पाहायला मिळत आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणी कुडाळ नगरपालिका आणी नगरपंचायत क्षेत्रात आंबा विकायला बंदी केल्याने सावंतवाडी वेंगुर्ला परिसरातील आंबा व्यावसायीकांचे कंबरडेच मोडून गेले आहे.

अखेर या आंबा व्यवसायिकांनी पर्याय म्हणून शेजारील गोवा राज्याकडे लक्ष केंद्रीत केले आहेत. सावंतवाडी, मळगाव, व्रजराट, वेंगुर्ले, आडेली आदी भागातील आंबा व्यावसायिक सध्या गोवा राज्यात जात तिथे आंबा विक्री करत आहेत. हापूस आंबा डझनाला 300 ते 400 रूपये दर मिळत आहे.

त्यामुळे गोव्यात आंब्याला जरी चांगला दर मिळत असला तरी वाहतुकीच्या दृष्टीने त्यांना हे परवडणारे नाही. स्थानिक आमदार, खासदार व मंत्री महोदय यासह नगराध्यक्ष व स्थानिक प्रशासनाने नगरपंचायत क्षेत्रात आंबा विक्री करण्यास परवानगी द्यावी. तसेच जिल्हातील ग्रामीण व शहरी भागात परवानगी दिली तर मेतकूटीस आलेल्या बागायतदार व आंबा विक्री करणारांना मोठा दिलासा मिळेल. अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील वजराट येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार विकास नारायण चव्हाण यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.