“सेवा हेच संघटन” ; “रूग्ण सेवा” हिच “ईश्वर सेवा” ! 

0
283

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १२ : “रूग्ण सेवा” हिच “ईश्वर सेवा” मानुन आपल्या कार्यात स्वतःला झोकून देत आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची, आपल्या सुख – दुःखांची परवा न करता समोर आलेल्या प्रत्येक रुग्णाची आईच्या मायेने आणि बहिणीच्या स्नेहाने शुश्रुषा करतात “परिचारिका माता भगिनीं”.  त्यांच्या नि:स्वार्थी सेवेचा “जागतिक परिचारिका दिना”  निमित्त भारतीय जनता पार्टी ओरोस मंडलाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जेष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी HA,HV व्ही.बी.ठाकर, आरोग्य सहाय्यक श्रीम.के.जी.पवार, HQ,ANM आर.आर.साळगावकर, ANM श्रीम.व्ही.बी.राठोड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मान्यता कुंटे, गटप्रवर्तक श्रीम.स्मृती कुंभार, औषध निर्माण अधिकारी डी.बी.मस्के, क्लार्क आर.आर.चव्हाण, वाहनचालक एन.व्ही.गोसावी, परिचर एस.के.सावंत इ. परिचारिका आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरिकांना बिस्किटे आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, सतीश माडये, लक्ष्मीकांत राणे, किरण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नालंदा काजरेकर, डॉ. आश्विनी खोत, उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.