जिल्ह्यात १५ आणि १६ मे रोजी वादळ सदृश्य पावसाची शक्यता

0
373

सिंधुदुर्गनगरी : दि. १२ : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रात शुक्रवार दि. १४ ते रविवार दि. १६ मे २०२१ रोजी वादळ सदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी दिली.

जिल्ह्यात शुक्रवार दिनांक १४ मे ते शनिवार दिनांक १५ मे २०२१ रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सुमारे ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे.

त्याचप्रमाणे रविवार दिनांक १६ मे २०२१ रोजी महाराष्ट्र व गोवा किनाऱ्यावर ४०, ४५ ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या कालावधीत सर्व मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याच्या सुचना दिल्या असून, समुद्र किनाऱ्यावरील गावे यांना सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे. त्यामुळे  शनिवार दिनांक १५ व रविवार १६ मे २०२१ रोजी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी न जाणाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तरी या अनुषंगाने योग्यती खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.