जिल्हाधिकाऱ्यांनी केला नर्सचा सन्मान ; मंगेश तळवणेकर यांचा उपक्रम

0
229

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि 12 | जागतिक परिचारीका दिनाच औचित्य साधून विठ्ठल-रखुमाई शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचा सन्मान करण्यात आला.जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते परिचारिकांना सन्मानित करण्यात आल. यामध्ये जिल्हा रुग्णालय ओरोस येथील नर्स सौ. प्राची प्रमोद राणे यांसह उपस्थित नर्स व्ही.व्ही.येळेकर, डिसोझा, व्ही.व्ही.गोसावी, आचरेकर, सुप्रीया नाईक, धारगळकर, पी.पी. सावंत यांचा गौरव करण्यात आला. यावेळी एसपी राजेंद्र दाभाडे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील, डॉ. दुर्भाटकर, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, अनिकेत पाटणकर, वसंत सावंत आदि उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.