ग्रामीण भागातील जनतेला दिलासा ; इथ होणार लसीकरण !

0
1037

सावंतवाडी |प्रतिनिधी |लसीकरणासाठी होणारी गैरसोय लक्षात घेत सबसेंटरला लसीकरण केल जाणार अस माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. त्याप्रेमाणे वेंगुर्ला तालुक्यात म्हापण, परुळे, आडाळी, आडेली, वेतुरा, तुळस, उभादांडा येथील पिएचसी, सबसेंटरमध्ये लसीकरण केल जाणर आहे.

तर सावंतवाडी तालुक्यात कोलगाव, आंबोली, चौकुळ इथ एक एक वेळा, चौकुळ इथ उद्या लसीकरण करण्यात येणार आहे. बांदा, रोणापाल या दोन ठिकाणी, तर निरवडे येथील लसीकरण केंद्र माजगाव इथ करण्याचा सूचना आमदार दीपक केसरकर यांनी दिल्यात.उद्या हे केंद्र सुरु केल जाईल. त्यामुळे माजगाव-चराठा यांना सावंतवाडीत याव लागणार नाही. सातार्डा सेंटर देखील सुरु करण्याचा विचार सुरु आहे.

दोडामार्ग तालुक्यात भेडशी, उसप, मोरगाव,आयी, तळकट, विलवडे आदि ठिकाणी  लसीकरण केल जाणर आहे. अशी माहिती माजी पालकमंत्री आ. दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला दिलासा मिळालाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.