शनिवार व रविवारी दोडामार्ग मध्ये लसीकरण नाही

0
225

दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. १५ : दोडामार्ग तालुक्यात बऱ्याच कालावधीनंतर प्रतिदिन 600 ते 800 कोविड लसी प्राप्त होत असल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर गर्दी होत होती. अनेकांनी या गर्दीतूनही आपले लसीकरण करून घेतले आहे. तर अनेकजण वेटिंग वर आहेत.
मात्र आज  शनिवार व उद्या रविवारी हे लसीकरण बंद असेल अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सध्या 45 वर्षांवरील लसीकरण सुरू असून पहिला व दुसरा डोस दिला जात आहे. मात्र सोमवार पर्यंत हे लसीकरण बंद राहील अशी माहिती देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.